Episodi

  • # 1497: चिखल पळवणारी टोळी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Jun 10 2024

    त्यांची टोळी ही साधी सुधी नसते. चांगले दोन अडिचशे टोळीचे सदस्य एकाचवेळी कल्ला करत घिरट्या घालत नदीकाठच्या चिखलावर तुटुन पडलेले दिसतात. चिमणीच्या आकाराच्या देखण्या भिंगरी पक्षांची सध्या घरटी बांधण्यासाठी धांदल उडाली आहे. हा पक्षी चिखलापासून आपलं घरटं बनवतो. यासाठी चिखल जमण्यासाठी समूहाने आरडून एकच कल्ला करत पाणवठ्यावर जमतो. त्याचे चिखल चोचीत जमवतानाचे दृष्य एखाद्या मोठ्या टोळीने एकत्र जमून हल्लाबोल उडवून द्यावा असं असतं.

    Mostra di più Mostra meno
    7 min
  • # 1496: भेट पांडुरंगाची. लेखिका नीता चं कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jun 9 2024

    मला आज त्या मुलामध्ये पांडुरंग दिसला .
    सोन्याचे दागिने ,झगमग कपडे, हार फुलं काहीही न ल्यायलेले हेच साधे भोळे लोक साक्षात देव असतात नीट बघितले की दिसतात...

    Mostra di più Mostra meno
    5 min
  • # 1495: लोभाने आंधळा झालेल्याची गोष्ट. (प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. )
    Jun 8 2024

    दुसऱ्या दिवशी त्याने चौथा दिवा लावला आणि घाईघाईने उत्तरेकडे निघाला. दिवा विझला.
    आणि त्याला कळले की हा महाल फक्त त्याच्यासाठी आहे.
    "नाही, गिरणी बंद करू नकोस." म्हातारा म्हणाला, "हा राजवाडा आता तुझा आहे. पण जोपर्यंत तू गिरणी चालवत आहेस तोपर्यंतच हा राजवाडा उभा राहील. गिरणी बंद पडली तर तो कोसळेल आणि तू सुद्धा त्याखाली मरशील" . म्हातारा पुन्हा म्हणाला,
    "तुझ्यासारखं मीही लोभापोटी साधूचे ऐकले नाही आणि माझे संपूर्ण तारुण्य ही गिरणी चालवण्यात घालवले."

    Mostra di più Mostra meno
    7 min
  • # 1494: डोंगरगावची पाणीबाणी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Jun 7 2024

    न्यूज चॅनलवाल्यांनी याचं पुन्हा एकदा फीचर केलं. त्याचा छोटासा इंटरव्ह्यू घेतला.
    ढसाढसा रडला म्हातारा. म्हणाला,
    "'मारवाडातलं गाव होतं माझं....पण एकदम कोरडं ठाक!! पाण्यासाठी चार चार किलोमीटर वणवण फिरायची आई माझी. आणि आईबरोबर मीही.
    एक एक थेंब प्राण कंठाशी आणायचा. पाण्यात देव दिसायचा. इथली उधळमाधळ बघितली की जीव तुटतो माझा. मला पता आहे, लोक माघारी माझी टिंगल करतात. पन धापैकी एक मानस तरी ऐकतो. माझा काम झाला की मग....!!‘

    Mostra di più Mostra meno
    8 min
  • # 1493: काश्यप ऋषींचे काश्मीर. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Jun 6 2024

    दुसऱ्या दिवशी, शंकराचार्यांना उपवास घडला हे ऐकल्यावर त्या दाम्पत्यास अतिशय वाइट वाटले.
    शिष्यांनी रात्री पाकसिद्धीसाठी वन्हीच उपलब्ध नसल्याचे सांगितले. तेव्हा त्या गृहिणीने थोडे पाणी हातात घेऊन मंत्रित करून लाकडांवर शिंपडून अग्नी प्रज्वलित केला हे बघुन शंकराचार्यांना मोठेच आश्चर्य वाटले. काश्मीरच्या सामान्य जनांकडूनही खुप काही शिकण्यासारखे आहे हे शंकराचार्यांना कळून चुकले होते.

    Mostra di più Mostra meno
    10 min
  • # 1492: "ते तर मला येतय्". लेखक : डॉ. कैलास दौंड. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jun 5 2024

    येत नाही हे कबूल करण्या ऐवजी "ते तर मला येतय्" असा धोषा लावला की अशी फजिती होते ....!

    Mostra di più Mostra meno
    6 min
  • # 1491: तसबीर तेरी दिलमे . लेखक श्री. संभाजी गायके.कथन: ( मीनल भडसावळे )
    Jun 5 2024

    ही गोष्ट स्वीडनची राजकन्या आणी एका महान कलाकाराच्या प्रेमाची आहे. फार खडतर प्रवास करून त्याने स्वीडन ह्या देशात पोचण्याची आहे. शार्लटची चारूलता होण्याची आहे.

    Mostra di più Mostra meno
    5 min
  • # 1490: नि:शब्द पान्हा. . कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jun 3 2024

    "दिस उजाडला की हंडा घेऊन पाणी भरायला कोसभर दुर जाव लागत. घरात पोटभर खायला नाय.
    घाम फुटतो पण पान्हा फुटना. तुम्हीच सांगा कुठून ह्याची भूक भागू ?"
    औषध नक्की कुणाला देऊ ?
    ज्याला भूक लागलीय म्हणून तो रडतोय त्या बाळाला, की दुध येत नाही म्हणून आईला ?
    की परिस्थितीला ?

    Mostra di più Mostra meno
    8 min