• आत्मनिर्भरतेसाठीची `गिअर-शिफ्टिंग`!
    Jul 20 2024

    कोरोनाच्या साठीचा काळ अनेक आव्हाने घेऊन आला पण त्याने काही नव्या संधीही समोर आणल्या. छत्रपती संभाजीनगर येथील विजय गियर्स या उद्योगासाठी आणि विजय दिगंबर मुळे या नेक्स्टजेन उद्योजकासाठी हा काळ आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने आणि आपल्या उत्पादनांच्या निर्यातीच्या बाबतीत अत्यंत मोलाचा ठरला. एकीकडे त्यांनी आपल्या वडिलांच्या सहकार्याने अद्ययावत रोबोटिक मशीन्सच्या माध्यमातून उत्पादनक्षमतेत भरीव वाढ केली आणि दुसरीकडे परदेशी बाजारपेठेत जम बसविण्यासाठी ठोस पावले उचलली.

    Mostra di più Mostra meno
    23 min
  • सर्वार्थाने `आत्मनिर्भर`!
    Jul 20 2024

    कॉन्ट्रक्ट मॅन्युफॅक्चरर ते ओईएम हा प्रवास सोपा नसतो. त्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर प्रचंड आत्मविश्वास आणि क्लायंटला हवे त्याहून अधिक देण्याची इच्छाशक्ती आवश्यक असते. त्याच पद्धतीने जागतिक पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध करुन तेथे जॉइंट व्हेंचर करण्यासाठी वेगळी कौशल्ये आवश्यक असतात. मिलिंद कुलकर्णी यांचा वारसा चालविणारे मिहिर आणि इशान हे बंधू याच ध्येयाने प्रेरित होऊन कार्यरत आहेत. ते सख्खे भाऊ आहेतच पण त्यापेक्षा अधिक असे घट्ट मित्र आहेत. त्यांच्यातील ट्यूनिंग अफलातून आहे...

    Mostra di più Mostra meno
    23 min
  • सचोटीपूर्ण वैद्यकसेवा
    Jul 20 2024

    `न्यूरोसायन्स ` हा अत्यंत गहन विषय. त्याचे अनेक पैलू वैद्यकक्षेत्रात कौशल्याचे मानले जातात. मोठ्या शहरांतील संधी सोडून एकेकाळी सोलापूरसारख्या शहरात या क्षेत्रातील प्रॅक्टीस सुरु करणाऱ्या डॉ. गिरीष वळसंगकर यांची पुढची पिढी डॉ. अश्निन व डॉ. शोनाली यांच्या आश्वासक नेतृत्वाखाली रुग्णसेवेत रममाण आहे. आपल्यातील १०० टक्के रुग्णांना देत असताना प्रसंगी स्वतःला तोशीष लागली तरी चालेल, अशा उदात्त भावनेतून सुरु असलेली त्यांची ही सेवा त्यांना वैद्यकक्षेत्राबरोबरच मानवतेच्या कसोटीवरही वरच्या स्तरावर पोहोचवते.

    Mostra di più Mostra meno
    25 min
  • स्वप्न `डेटा ड्रिव्हन इन्फ्रा कंपनी`चे
    Jul 20 2024

    नव्या भारताच्या उभारणीत पुढील एक-दोन दशके इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी अत्यंत मोलाची ठरणार आहेत. भक्कम पायाभूत सोयीसुविधांच्या उभारणीतून देशाच्या सर्वांगीण प्रगतीची दिशा खुली होणार आहे. हे इन्फ्रास्ट्रक्चर उभारणाऱ्या उद्योगांसाठी सुद्धा हा काळ आपले कर्तृत्व सिद्ध करणारा ठरतो आहे. सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चरच्या उभारणीत आघाडी घेणाऱ्या पी.यू. कुलकर्णी आणि निखिल यांनी शारदा इन्फ्राटेकच्या माध्यमातून डिफेन्स, ड्रायपोर्ट, रेल्वे, हायवे, पाणीपुरवठा योजना आदी क्षेत्रांतील कामांत दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.

    Mostra di più Mostra meno
    25 min
  • आत्मनिर्भरतेकडे घोडदौड...
    Jul 20 2024

    पावडर कोटिंग तंत्रज्ञानातून अनेक नव्या सुविधांचा जन्म झाला. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे यातून उद्योगातील एक नवा प्रवाह विकसित झाला. रमेश भिसे यांनी पावडर कोटिंग प्लॅंटच्या डिझाईन आणि उभारणीमध्ये स्वतःला वाहून घेतले. त्यांच्या कर्तबगार व मेहनती मुलाने, रोहन यांनी हा उद्योग पुढे चालविण्याचे ठरविले. त्यासाठी कठोर मेहनत घेतली आणि पाहता पाहता आपला उद्योग सातासमुद्रापारही नेला! केवळ फ्लॅंटच नव्हे, तर सोल्युशन्स पुरविणे ही त्यांची ओळख बनली आहे....!

    Mostra di più Mostra meno
    24 min
  • रिटकोलॅंड....खमंग चवीचा प्रदेश!
    Jul 20 2024

    ` आपला शेवचिवडा १९४९ पासून विकला जात आहे. आपले पाहून शेजारच्या तालुक्यातील माणसाने कालपरवाच फरसाण बनवून विकायला सुरुवात केली. त्याने थोड्याच दिवसांत प्रगती केली तर मग आपण का करु शकत नाही?` अरुण शामराव मर्ढेकर यांना पडलेला हा पहिला प्रश्न त्यांना एका नव्या टप्प्यावर नेणारा ठरला. आता त्यांना पडलेल्या `बिकानेर`चा ब्रॅंड जगप्रसिद्ध होतो तर `रिटकवलीचा ब्रॅंड `जगभर का नेऊ नये?` या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी शेजारील जिल्हे आणि मुंबई गाठली आहे. २०३५ पर्यंत देशभरात विस्तारण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

    Mostra di più Mostra meno
    26 min
  • माणूस महत्त्वाचा...!
    Jul 20 2024

    दुचाकी वाहने ते `अर्थमूव्हिंग मशीनरी` अशा प्रदीर्घ उत्पादनश्रेणीत एकंदर ११ जिल्ह्यांतील १४ शहरांतून २६ `कस्टमर टच पॉइंटस्` हाताळणाऱ्या `रत्नप्रभा मोटर्स प्रा.लि.` च्या अर्जुनसिंह मानसिंह पवार यांच्या दृष्टीने वाहन निर्माते, ग्राहक आणि आपले कर्मचारी हे त्यांच्या व्यवसायाचे तीन आधारस्तंभ आहेत. हे तीनही घटक समाधानी असतील तरच हा व्यवसाय विस्तारू शकतो. कारण, यामध्ये माणूस महत्त्वाचा आहे, असे ते आवर्जून सांगतात. आधीच्या पिढीचा हा माणुसकीचा वारसा समर्थपणे पुढे नेताना ते नवनवी उंची गाठत आहेत.

    Mostra di più Mostra meno
    25 min
  • एक आगळा `उद्योग-संगम`!
    Jul 19 2024

    सन १९५२ मध्ये पेट्रोलपंप, १९६२ मध्ये गॅस एजन्सी, १९७४ मध्ये हॉटेल, पुढे टप्प्याटप्प्याने संपूर्ण हॉस्पिटॅलिटी चेन, त्यानंतर गृहनिर्माण उद्योग आणि वेगळी वाट धुंडाळत एक आयटी कंपनी...कराडच्या कुलकर्णी परिवारातील चार पिढ्यांचा हा आलेख. बाळासाहेब कुलकर्णी यांनी हॉटेल व्यवसाय नावारुपाला आणला तर कुणाल आणि करण या पुढच्या पिढीने अक्षरशः सगळ्याच क्षेत्रांवर आपले नाव कोरण्याचा उत्साह दाखवला. वेगवेगळी क्षेत्रे निवडून त्यात उत्तम कामगिरी बजावली. अशा प्रकारचा उद्योगविस्तार खूप आगळावेगळा वाटतो.

    Mostra di più Mostra meno
    24 min