Moving Aspirations मूव्हिंग ॲस्पिरेशन्स २ः उद्यमी `नेक्स्टजेन`चा परिणामकारक प्रवास copertina

Moving Aspirations मूव्हिंग ॲस्पिरेशन्स २ः उद्यमी `नेक्स्टजेन`चा परिणामकारक प्रवास

Moving Aspirations मूव्हिंग ॲस्पिरेशन्स २ः उद्यमी `नेक्स्टजेन`चा परिणामकारक प्रवास

Di: Datta Joshi
Ascolta gratuitamente

3 mesi a soli 0,99 €/mese

Dopo 3 mesi, 9,99 €/mese. Si applicano termini e condizioni.

A proposito di questo titolo

पहिल्या पिढीत उद्योगाचा पाया रचला जातो खरा, मात्र त्यावर उत्तुंग इमारत बांधण्याचे आव्हान पुढील पिढीतील उद्योजकांपुढे असते. हे आव्हान ते कसे पेलतात, त्यांचा उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा विकसित होतो, नवीन्याची ओढ असतानाच अनुभवातून आलेल्या ज्ञानाची जोड कशी मिळते अशा अनेक गोष्टींची उलगड त्यांच्याकडूनच होते, तेव्हा त्यातील सच्चेपणा अधिक बोलका असतो. म्हणूनच, प्रेरक लेखक दत्ता जोशी यांच्या संकल्पनेतून आणि शब्दांमधून साकारलेल्या `मूव्हिंग ॲस्पिरेशन` मालिकेचा हा दुसरा भाग ऐकणं हा एक समृद्ध करणारा अनुभव ठरतो.Datta Joshi Economia Gestione e leadership Leadership
  • आत्मनिर्भरतेसाठीची `गिअर-शिफ्टिंग`!
    Jul 20 2024

    कोरोनाच्या साठीचा काळ अनेक आव्हाने घेऊन आला पण त्याने काही नव्या संधीही समोर आणल्या. छत्रपती संभाजीनगर येथील विजय गियर्स या उद्योगासाठी आणि विजय दिगंबर मुळे या नेक्स्टजेन उद्योजकासाठी हा काळ आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने आणि आपल्या उत्पादनांच्या निर्यातीच्या बाबतीत अत्यंत मोलाचा ठरला. एकीकडे त्यांनी आपल्या वडिलांच्या सहकार्याने अद्ययावत रोबोटिक मशीन्सच्या माध्यमातून उत्पादनक्षमतेत भरीव वाढ केली आणि दुसरीकडे परदेशी बाजारपेठेत जम बसविण्यासाठी ठोस पावले उचलली.

    Mostra di più Mostra meno
    23 min
  • सर्वार्थाने `आत्मनिर्भर`!
    Jul 20 2024

    कॉन्ट्रक्ट मॅन्युफॅक्चरर ते ओईएम हा प्रवास सोपा नसतो. त्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर प्रचंड आत्मविश्वास आणि क्लायंटला हवे त्याहून अधिक देण्याची इच्छाशक्ती आवश्यक असते. त्याच पद्धतीने जागतिक पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध करुन तेथे जॉइंट व्हेंचर करण्यासाठी वेगळी कौशल्ये आवश्यक असतात. मिलिंद कुलकर्णी यांचा वारसा चालविणारे मिहिर आणि इशान हे बंधू याच ध्येयाने प्रेरित होऊन कार्यरत आहेत. ते सख्खे भाऊ आहेतच पण त्यापेक्षा अधिक असे घट्ट मित्र आहेत. त्यांच्यातील ट्यूनिंग अफलातून आहे...

    Mostra di più Mostra meno
    23 min
  • सचोटीपूर्ण वैद्यकसेवा
    Jul 20 2024

    `न्यूरोसायन्स ` हा अत्यंत गहन विषय. त्याचे अनेक पैलू वैद्यकक्षेत्रात कौशल्याचे मानले जातात. मोठ्या शहरांतील संधी सोडून एकेकाळी सोलापूरसारख्या शहरात या क्षेत्रातील प्रॅक्टीस सुरु करणाऱ्या डॉ. गिरीष वळसंगकर यांची पुढची पिढी डॉ. अश्निन व डॉ. शोनाली यांच्या आश्वासक नेतृत्वाखाली रुग्णसेवेत रममाण आहे. आपल्यातील १०० टक्के रुग्णांना देत असताना प्रसंगी स्वतःला तोशीष लागली तरी चालेल, अशा उदात्त भावनेतून सुरु असलेली त्यांची ही सेवा त्यांना वैद्यकक्षेत्राबरोबरच मानवतेच्या कसोटीवरही वरच्या स्तरावर पोहोचवते.

    Mostra di più Mostra meno
    25 min
Ancora nessuna recensione