Episodi

  • शोशिन
    Jul 5 2026

    आपण अनेकदा नवीन गोष्टी शिकणं थांबवतो, कारण आपल्याला वाटतं, "हे तर मला आधीच माहीत आहे." पण खरं शिकणं तेव्हाच सुरू होतं, जेव्हा आपण प्रत्येक अनुभवाकडे, प्रत्येक माणसाकडे आणि प्रत्येक दिवसाकडे नवशिक्याच्या कुतूहलाने पाहतो.

    या भागात जाणून घेऊया झेन तत्त्वज्ञानातील "शोशिन" (Beginner's Mind) ही सुंदर संकल्पना आणि ती आपल्या दैनंदिन जीवनात, नात्यांमध्ये, कामात आणि आत्मविकासात कशी परिवर्तन घडवू शकते.

    जर हा विचार आवडला, तर व्हिडिओला Like करा, Share करा आणि अशाच विचारप्रवर्तक भागांसाठी Channel ला Subscribe करायला विसरू नका.

    #विवेकीकट्टा #मराठी #शोशिन #आत्मविकास #जीवनवेध

    Mostra di più Mostra meno
    4 min
  • आमोर फाटी
    Jul 4 2026

    "हे माझ्याच बाबतीत का?" हा प्रश्न आपण सगळेच कधी ना कधी विचारतो. पण जर प्रत्येक संकटाकडे, अपयशाकडे आणि अनपेक्षित वळणाकडे आयुष्याने दिलेली संधी म्हणून पाहता आलं तर?

    या भागात आपण फ्रेडरिक नीत्शेच्या Amor Fati या प्रभावी तत्त्वज्ञानाचा अर्थ समजून घेऊ. स्वीकृतीपलीकडे जाऊन, आपल्या नियतीवर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय? संत तुकाराम आणि सावरकरांच्या जीवनातील प्रेरणादायी उदाहरणासह या विचाराची आजच्या जीवनातील उपयुक्तता जाणून घेऊया.

    #AmorFati #Nietzsche #मराठी #SelfGrowth

    Mostra di più Mostra meno
    4 min
  • ब्लॅक अँड व्हाईट
    Mar 11 2026

    आज सोशल मीडियाच्या काळात प्रत्येक गोष्ट जणू दोनच रंगांत विभागली गेली आहे — ब्लॅक किंवा व्हाईट.
    मतभेदांना जागा उरली आहे का?
    आजच्या विवेकी कट्ट्यावर — ब्लॅक अँड व्हाईट विचारसरणीचा समाजावर होणारा परिणाम.

    Mostra di più Mostra meno
    5 min
  • वाचनाचा कंटाळा — आता संपला!
    Mar 1 2026

    तुम्हालाही असं होतं का? पुस्तक उचलतो, दोन-तीन पानं वाचतो — आणि मग कंटाळा येऊन बंद करतो? 😅

    तर हा episode फक्त तुमच्यासाठीच आहे!

    या episode मध्ये आपण ऐकूया — वाचनाचा कंटाळा का येतो, मेंदू काय करतो, आणि ५ simple tricks ज्या वापरून तुम्ही वाचनाची सवय हळूहळू लावू शकता — without any pressure!

    वाचन ही sprint नाही — ही marathon आहे.

    आजपासून सुरुवात करूया, एक पान एक वेळी!

    #MarathiPodcast #वाचनसवय #BookLovers #SelfImprovement #मराठी


    Mostra di più Mostra meno
    4 min
  • पॉडकास्ट कुणी ऐकतं का?
    Feb 12 2026

    आपण बोलतोय… पण खरंच कुणी ऐकतंय का?
    पॉडकास्ट सुरू करताना प्रत्येकाच्या मनात येणारा हा प्रामाणिक आणि थोडासा अस्वस्थ करणारा प्रश्न.

    या भागात आपण पॉडकास्टच्या अदृश्य श्रोत्यांबद्दल बोलतो —
    संख्या कमी असली तरी लक्ष देऊन ऐकणाऱ्या लोकांबद्दल.
    रील्सच्या गोंगाटात आणि लाईक्सच्या जगात, शांतपणे निवडून ऐकणाऱ्या श्रोत्यांची किंमत काय असते?

    थोडा विनोद, थोडं आत्मपरीक्षण…
    आणि एक साधा पण महत्त्वाचा विचार —
    “आपण बोलतोय ते खरंच कुणासाठी?” 🎙️

    Mostra di più Mostra meno
    3 min
  • कामासाठी एआयचा वापर करावा का?
    Jan 26 2026

    एआय सध्या सर्वत्र आहे — कंटेंट क्रिएशन, व्हॉईसओव्हर, इमेजेस, म्युझिक, अगदी चित्रपट निर्मितीपर्यंत. पण प्रश्न असा आहे की एआय वापरणं योग्य आहे का? तो आपल्या कामाला मदत करतो की सर्जनशीलतेला मारक ठरतो?

    या भागात आपण एआयकडे एक टूल म्हणून पाहतो — ब्रशसारखं, कॅमेरासारखं, सर्जरीच्या उपकरणांसारखं. कलाकार महत्वाचा की साधन? गुणवत्ता आणि संवंगगिरी यामधला फरक काय? आणि भविष्यात खरा कलाकार कुठे उभा राहील?

    विवेकाने विचार करूया —
    एआय आपला नोकर असावा की मालक?

    ऐका, विचार करा आणि तुमचं मत जरूर कळवा. 🎧

    Mostra di più Mostra meno
    5 min
  • आकाशवाणी - 'हॅलो डॉक्टर' - पुष्पौषधींचे फायदे
    Jan 3 2026

    'पुष्पौषधीचे फायदे' या विषयी पुष्पौषधी आणि होमीओपॅथी तज्ञ डॉ. अमित करकरे यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांची दिलेली उत्तरे आणि माहिती.

    सूत्रसंचालन, निर्मिती सहाय्य - आरती पटवर्धन

    सादरकर्ते - विक्रांत मंडपे

    प्रथम प्रसारण - शनिवार, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरून

    Mostra di più Mostra meno
    28 min
  • थिंकींग, फास्ट & स्लो - पुस्तक कट्टा
    Jan 29 2025

    मनाचा गूढसोपेपणा उलगडून टाकणारं पुस्तक म्हणजे नोबेल विजेते डॅनियल काह्नमन यांनी लिहीलेले - थिंकींग, फास्ट & स्लो.

    आपले मन हा एक गूढ पेटारा आहे… गेल्या हजारो वर्षात मानवाने प्रचंड प्रगती केली, निरनिराळे शोध लावले, अशक्य अशा गोष्टी साध्य केल्या पण अजूनही मनाचा गुंता आपल्याला समजला आहे असं ठामपणे म्हणता येणार नाही. आपल्यापैकी प्रत्येकाची विचार करण्याची एक स्वतंत्र शैली आहे, पण तरिही सायकोलॉजीच्या अभ्यासकांनी मन समजून घेण्याचे काही पॅटर्न्स शोधून काढलेच आहेत ज्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाचे मन थोड्याफार प्रमाणात समजून घेणे जमू लागले आहे… आपण विचार कसा करतो, निर्णय कसे घेतो, एखाद्या घटनेकडे कोणकोणत्या दृष्टीकोनातून बघतो, आणि या सगळ्याचा आपल्या विचार व भावनांवर कसा परीणाम होतो या वर चर्चा करणार्‍या या पुस्तकाबद्दल आपण समजून घेणार आहोत आजच्या या पुस्तक कट्ट्यावर.


    #PustakKatta #MarathiPodcast #BookSummary #BookDiscussion #ThinkingFastAndSlow #DanielKahneman #CognitiveBias #DecisionMaking #BehavioralScience #CriticalThinking #PsychologyOfThinking #BehavioralEconomics #MentalModels #ThinkBetter #RationalThinking #marathi #podcast #dramitkarkare

    Mostra di più Mostra meno
    15 min