• स्वीकृत: सुहास शिरवळकर (सुशि) नमुना प्रकरण Swikrut: Suhas Shirvalkar (SUSHI) Audio Sample
    Aug 22 2026

    काही गोष्टी आपण मनाने स्वीकारतो, तर काही परिस्थितीमुळे स्वीकाराव्या लागतात. 'स्वीकृत' ही कादंबरी मानवी मनातील अशाच एका खोल संघर्षाची कथा आहे. नात्यांमधील ओढ, अंतर आणि शेवटी येणारे 'स्वीकार्य' वास्तव सुहास शिरवळकर यांनी अत्यंत संवेदनशीलतेने मांडले आहे. शिरवळकरांची लेखणी इथे केवळ रहस्य मांडत नाही, तर मानवी भावभावनांचे पदर उलगडते. जेव्हा एखादे नाते एका वळणावर येते, तेव्हा मनाची होणारी द्विधा अवस्था आणि त्यातून मार्ग काढण्याची धडपड यात चित्रित केली आहे.
    कौटुंबिक नाट्याचा आणि भावनिक प्रवासाचा भावस्वाद घेणाऱ्या श्रोत्यांसाठी ही एक उत्तम भेट आहे.
    एक प्रगल्भ अनुभव... आजच ऐका 'स्वीकृत' फक्त स्टोरीटेल वर संचित वर्तक यांच्या आवाजात! येथ ऐका नमुना प्रकरण.

    Mostra di più Mostra meno
    38 min
  • सनसनाटी: सुहास शिरवळकर Sansanati: Suhas Shirvalkar (नमुना प्रकरण)
    Aug 12 2026

    बुलाख गावातील उत्खननात पुरातत्व खात्याला काही धक्कादायक गोष्टी सापडल्या आहेत. त्या इजिप्शिअन संस्कृतीशी नातं सांगणाऱ्या आहेत. सायल, हवापालटासाठी त्या गावी येते. आणि सुरु होते एक धक्कादायक घटनांची श्रुंखला. त्य गाडल्या गेलेल्या वैभवी प्राचीन संस्कृतीशी सायलीशी काहीतरी संबंध आहे पूर्वजन्मीचा, तो कसा? हे कसे समजते? कहाणी पुढे जाताना कित्येक उत्कंठा वाढवणाऱ्या, रोमांचित करणाऱ्या, घटना घडत जातात, त्या कोणत्या हे नक्की ऐका अनुपमा ताकमोगे यांच्या आवाजात. सुहास शिरवळकर लिखीत सनसनाटी एका वेगळ्याच पार्श्वभूमीवरील थरारक, अद्भुत, रहस्यप्रधान कादंबरी. येथे ऐका नमुना प्रकरण आणि संपूर्ण कादंबरी ऐका स्टोरीटेल app वर .

    Mostra di più Mostra meno
    41 min
  • डिटेक्टिव्ह अल्फा आणि ग्रामदेवतेचा प्रकोप: सौरभ वागळे (ऐका नमुना प्रकरण)
    Aug 5 2026

    मुंबईतून कोकणच्या वाटेवर जाताना समुद्रकिनारी, गर्द नारळ-आंब्यांच्या झाडांच्या कुशीत वसलेलं नावगाव हे गाव जितकं सुंदर, तितकेच तिथं राहणारे लोक चमत्कारिक. गावात देव कालभैरवाचं एक पुरातन मंदिर आहे. गावकऱ्यांची अशी समजूत आहे, की या मंदिरातला देव हा जागृत आहे. तो रात्रीच्या अंधारात मंदिराबाहेर पडतो आणि गावाचं रक्षण करतो. पण त्याची दृष्टी इतकी प्रखर आहे, की त्यात चुकून जर कोणी मनुष्य आला, तर तोही जळून भस्म होतो. या देवतेच्या भीतीने गावातले लोक रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडायला घाबरतात. अशा या नावगावातून अल्फाला एक गूढ निनावी पत्र येतं आणि मग सुरू होतो एक जीवघेणा खेळ. गावातले जुने मुरब्बी लोक एक एक करून मरायला लागतात आणि मंदिरातील देवतेचा प्रकोप झाला, अशी गावकऱ्यांची समजूत होते. डिटेक्टिव्ह अल्फा आणि त्याचा मित्र प्रभव यांच्यासमोर आव्हान आहे, या गावात घडणाऱ्या अनैसर्गिक, दैवी वाटणाऱ्या घटनांमागचं सत्य शोधून काढण्याचं. ते हे करू शकतील का ? ऐका सौरभ वागळे लिखीत 'डिटेक्टिव्ह अल्फा आणि ग्रामदेवतेचा प्रकोप'चे नमुना प्रकरण येथे आणि पूर्ण कथा ऐका फक्त स्टोरीटेलवर कृणाल आळवेंच्या दमदार आवाजात.

    Mostra di più Mostra meno
    29 min
  • श्रीमान योगी: रणजीत देसाई (ऐका नमुना प्रकरण)
    Jul 29 2026

    रणजित देसाई यांची अजरामर कलाकृती 'श्रीमान योगी' आता एका नव्या रूपात! छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ एक योद्धा नव्हे, तर एक युगपुरुष, आदर्श पुत्र आणि रयतेचा राजा. त्यांच्या आयुष्यातील थरार आणि भावनांचा प्रवास म्हणजे हे महाकाव्य. अनिरुद्ध दडके यांच्या दमदार आणि ओघवत्या आवाजात ऐका स्वराज्याचा देदिप्यमान इतिहास. सह्याद्रीच्या कडांमधील पडसाद आणि महाराजांचे अलौकिक चातुर्य आता तुमच्या कानात गुंजणार आहे. एक श्रेष्ठ साहित्यिक ठेवा आणि मंत्रमुग्ध करणारी शब्दशक्ती यांचा हा अद्भूत संगम. शिवचरित्राचा हा ऑडिओ अनुभव तुमच्या संग्रही असायलाच हवा! ऐका स्टोरटेलवर! येथ ऐका एक नमुना प्रकरण.

    Mostra di più Mostra meno
    1 ora e 33 min
  • डिटेक्टिव्ह अल्फा आणि 'ब्लू मूर'चे रहस्य : सौरभ वागळे (ऐका नमुना प्रकरण)
    Jul 29 2026

    भारतीय गुप्तचर संघटनेच्या हेडक्वार्टरमधून अत्यंत गोपनीय कागदपत्रांची चोरी झाली आहे. ती कागदपत्रे चोरणारा 'रॉ'चाच एक गद्दार एजंट मनीषकुमार बेदी हा इंग्लंडमध्ये जाऊन धडकतो. बेदीला 'रॉ'चे इतर एजंट्स ठाऊक असल्याने त्याला पकडण्यासाठी 'रॉ'ला हवाय कोणीतरी त्रयस्थ गुप्तहेर आणि पहिलं नाव समोर येतं अल्फाचं ! अल्फा इंग्लंडमध्ये पोचतो आणि तिथे केंब्रिज विद्यापीठात संशोधन करणाऱ्या त्याच्या प्रिय मित्राला प्रभवला सोबत घेतो. आणि मग सुरू होतं अॅडव्हेंचर ! अल्फा आणि प्रभव बेदीपर्यंत पोचतात, पण त्याच्या खोलीत तो मरून पडलेला आढळतो. त्याने चोरलेली कागदपत्रे गायब आहेत आणि त्याच्या मोबाइलवर एक गूढ मेसेज टाइप केलेला आहे 'फाईंड ब्लू मूर'! बेदीकडची कागदपत्रे कोणी चोरली? शत्रू राष्ट्रांच्या हातात पडण्याआधी अल्फा ती कशी मिळवणार? आणि बेदीने पाठवलेल्या गूढ मेसेजचा अर्थ काय आहे ? ऐका कृणाल आळवेच्या दमदार आवाजात. येथ ऐका नमुना प्रकरण आणि संपूर्ण कथा ऐका स्टोरीटेलवर.

    Mostra di più Mostra meno
    34 min
  • राधेय: रणजित देसाई (ऐका नमुना प्रकरण)
    Jul 22 2026

    नशिबाने नाकारलेला पण कर्माने श्रेष्ठ ठरलेला महायोद्धा-'कर्ण'. रणजित देसाई यांची अजरामर कादंबरी 'राधेय' आता एका अस्वस्थ करणाऱ्या आवाजात. महाभारताच्या युद्धभूमीवरील कर्णाचे शौर्य आपण जाणतोच, पण त्याच्या मनातील द्वंद्व, त्याची अजोड दानशूरता आणि त्याने सोसलेली उपेक्षा यांचा हा हृदयद्रावक प्रवास आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर यांच्या भारदस्त आणि भावस्पर्शी आवाजाने या कथेला चार चाँद लावले आहेत. कर्णाचे एकाकीपण आणि त्याचे तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्व खेडेकरांनी आपल्या आवाजातून जिवंत केले आहे. नियतीशी झुंज देणाऱ्या एका महानायकाची ही गाथा प्रत्येक मराठी रसिक श्रोत्याने ऐकायलाच हवी. येथे ऐका एक नमुना प्रकरण. पूर्ण कादंबरी ऐका फक्त स्टोरीटेल वर!

    Mostra di più Mostra meno
    16 min
  • सरकारी दवाखाना: डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे (ऐका नमुना प्रकरण) Sarkari Davakhana : Dr Suryakant Koyade (sample episode in Marathi)
    Jul 15 2026

    जेव्हा रुग्णासाठी पैसा संपतो, सोनं गहाण ठेवलं जातं, कधीकधी जमीन विकावी लागते तेव्हा सरकारी दवाखान्याची पायरी दिसू लागते आणि एक प्रवास सुरू होतो... मृत्यूची वाट बघण्याचा! अपघात विभागात घडणाऱ्या घटना, आयसीयूमधील आपल्या व्यक्तीचा मृत्यू, शेवटच्या क्षणी होणारी नातेवाईकांची घालमेल, पोस्टमार्टम करणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य, डॉक्टर लोकांचं व्यवसायिक आणि खाजगी जीवन, डिलिव्हरी वॉर्ड!
    खूप वर्षांनंतर बाळाच्या जन्माचा आनंद... सगळंच वाईट नाही, काही चांगल्याही गोष्टी!
    सरकारी दवाखान्यातील लावारिस लोक, गर्दी, तिथला वास, कचराकुंडीत नाळेसहीत सापडलेलं बाळ, छातीवर 'मृत्यू' अशा नावाचा टॅटू काढणारा कर्मचारी, म्हाताऱ्यांची प्रेम कहानी, स्वतःच्या हाताने आपल्या मुलाचं व्हेंटिलेटर बंद करणारा बाप... काय नाही या कादंबरीत!
    हे सगळं सुरू असतानाच घडणारा वेगवान घटनाक्रम आणि दवाखान्याच्या चार भिंतींच्या नकळत घडणारे एक युद्ध!
    सस्पेन्स थ्रिलरने भरलेला एक फार मोठा गुन्हा... आणि त्याची उकल!
    एकीकडं माणूस वाचवा म्हणून प्रयत्न करणारी माणसं आणि दुसरीकडं मढ्यावरचं लोणी खाणारी माणसं! ही कादंबरी तुम्हाला जगण्याची आशा देईल, नात्यांचं महत्त्व देईल, माणसाची किंमत देईल... हसणं देईल, रडणं देईल!
    ही कादंबरी तुम्हाला सोडून गेलेल्या तुमच्या एकातरी माणसाची आठवण करून देईल!
    संपूर्ण कादंबरी ऐका फक्त स्टोरीटेल ऍपवर, अनिरुद्ध दडके ह्यांच्या भावनाप्रधान आवाजात.

    Mostra di più Mostra meno
    15 min
  • खजाना: नितीन थोरात (नमुना प्रकरण)
    Jul 8 2026

    नितीन थोरात यांची 'खजिना' ही कादंबरी प्राचीन गड-किल्ले आणि लपलेल्या खजिन्याच्या रहस्यावर आधारित आहे. इतिहास, गूढ आणि साहसाचा हा अद्भुत संगम तुम्हाला एका अविस्मरणीय प्रवासावर नेईल. महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा उलगडणारी ही खिळवून ठेवणारी कथा नक्की ऐका, मंदार फणसे यांच्या आवाजात!
    आजच ऐका 'स्टोरीटेल'वर!

    Mostra di più Mostra meno
    41 min