Storyside Marathi - First Chapter copertina

Storyside Marathi - First Chapter

Storyside Marathi - First Chapter

Di: Storyside India
Ascolta gratuitamente

तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात? 'स्टोरीसाइड मराठी: फर्स्ट चॅप्टर्स' मध्ये तुमचे स्वागत आहे! 🎧 येथे तुम्हाला मिळतील मराठीतील सर्वोत्तम ऑडिओबुक्सचे पहिले भाग अगदी मोफत. अजरामर साहित्यापासून ते थरारक क्राईम थ्रिलर्स, प्रेरणादायी चरित्रे आणि आजच्या काळातील बेस्ट-सेलर्सपर्यंत - साहित्याचा हा खजिना आता तुमच्या कानात! प्रत्येक एपिसोडमध्ये एका नव्या कथेची झलक अनुभवा. जर तुम्हाला पुढची गोष्ट ऐकायची असेल, तर आजच 'Storytel' ॲप डाउनलोड करा आणि हजारो मराठी ऑडिओबुक्सचा आनंद घ्या. Love a good story? Welcome to Storyside Marathi: First Chapters! 🎧 Get a front-row seat to the best of Marathi literature in audio. From the timeless classics to gripping crime thrillers, inspiring biographies, and modern-day bestsellers—experience the magic of storytelling on the go. In this podcast, we bring you the exclusive first chapters of our top-rated Marathi audiobooks for free. 👉 Hooked on a story? Don't stop now! Download the Storytel app to listen to the full versions of these titles and explore our massive library of Marathi audio content.@storysideindia Arte Storia e critica della letteratura
  • सनसनाटी: सुहास शिरवळकर Sansanati: Suhas Shirvalkar (नमुना प्रकरण)
    Aug 12 2026

    बुलाख गावातील उत्खननात पुरातत्व खात्याला काही धक्कादायक गोष्टी सापडल्या आहेत. त्या इजिप्शिअन संस्कृतीशी नातं सांगणाऱ्या आहेत. सायल, हवापालटासाठी त्या गावी येते. आणि सुरु होते एक धक्कादायक घटनांची श्रुंखला. त्य गाडल्या गेलेल्या वैभवी प्राचीन संस्कृतीशी सायलीशी काहीतरी संबंध आहे पूर्वजन्मीचा, तो कसा? हे कसे समजते? कहाणी पुढे जाताना कित्येक उत्कंठा वाढवणाऱ्या, रोमांचित करणाऱ्या, घटना घडत जातात, त्या कोणत्या हे नक्की ऐका अनुपमा ताकमोगे यांच्या आवाजात. सुहास शिरवळकर लिखीत सनसनाटी एका वेगळ्याच पार्श्वभूमीवरील थरारक, अद्भुत, रहस्यप्रधान कादंबरी. येथे ऐका नमुना प्रकरण आणि संपूर्ण कादंबरी ऐका स्टोरीटेल app वर .

    Mostra di più Mostra meno
    41 min
  • डिटेक्टिव्ह अल्फा आणि ग्रामदेवतेचा प्रकोप: सौरभ वागळे (ऐका नमुना प्रकरण)
    Aug 5 2026

    मुंबईतून कोकणच्या वाटेवर जाताना समुद्रकिनारी, गर्द नारळ-आंब्यांच्या झाडांच्या कुशीत वसलेलं नावगाव हे गाव जितकं सुंदर, तितकेच तिथं राहणारे लोक चमत्कारिक. गावात देव कालभैरवाचं एक पुरातन मंदिर आहे. गावकऱ्यांची अशी समजूत आहे, की या मंदिरातला देव हा जागृत आहे. तो रात्रीच्या अंधारात मंदिराबाहेर पडतो आणि गावाचं रक्षण करतो. पण त्याची दृष्टी इतकी प्रखर आहे, की त्यात चुकून जर कोणी मनुष्य आला, तर तोही जळून भस्म होतो. या देवतेच्या भीतीने गावातले लोक रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडायला घाबरतात. अशा या नावगावातून अल्फाला एक गूढ निनावी पत्र येतं आणि मग सुरू होतो एक जीवघेणा खेळ. गावातले जुने मुरब्बी लोक एक एक करून मरायला लागतात आणि मंदिरातील देवतेचा प्रकोप झाला, अशी गावकऱ्यांची समजूत होते. डिटेक्टिव्ह अल्फा आणि त्याचा मित्र प्रभव यांच्यासमोर आव्हान आहे, या गावात घडणाऱ्या अनैसर्गिक, दैवी वाटणाऱ्या घटनांमागचं सत्य शोधून काढण्याचं. ते हे करू शकतील का ? ऐका सौरभ वागळे लिखीत 'डिटेक्टिव्ह अल्फा आणि ग्रामदेवतेचा प्रकोप'चे नमुना प्रकरण येथे आणि पूर्ण कथा ऐका फक्त स्टोरीटेलवर कृणाल आळवेंच्या दमदार आवाजात.

    Mostra di più Mostra meno
    29 min
  • श्रीमान योगी: रणजीत देसाई (ऐका नमुना प्रकरण)
    Jul 29 2026

    रणजित देसाई यांची अजरामर कलाकृती 'श्रीमान योगी' आता एका नव्या रूपात! छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ एक योद्धा नव्हे, तर एक युगपुरुष, आदर्श पुत्र आणि रयतेचा राजा. त्यांच्या आयुष्यातील थरार आणि भावनांचा प्रवास म्हणजे हे महाकाव्य. अनिरुद्ध दडके यांच्या दमदार आणि ओघवत्या आवाजात ऐका स्वराज्याचा देदिप्यमान इतिहास. सह्याद्रीच्या कडांमधील पडसाद आणि महाराजांचे अलौकिक चातुर्य आता तुमच्या कानात गुंजणार आहे. एक श्रेष्ठ साहित्यिक ठेवा आणि मंत्रमुग्ध करणारी शब्दशक्ती यांचा हा अद्भूत संगम. शिवचरित्राचा हा ऑडिओ अनुभव तुमच्या संग्रही असायलाच हवा! ऐका स्टोरटेलवर! येथ ऐका एक नमुना प्रकरण.

    Mostra di più Mostra meno
    1 ora e 33 min
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Ancora nessuna recensione