Screen Time With Mukta copertina

Screen Time With Mukta

Di: Mukta Chaitanya
  • Riassunto

  • नमस्कार, स्क्रीन टाइम विथ मुक्ता या माझ्या पॉड कास्ट मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. या पॉडकास्टमध्ये आपण सायबर चॅट करणार आहोत. ऑनलाईन ट्रेंड्सपासून सायबर स्पेसचा आपल्यावर होणाऱ्या परिणामांपर्यंत सगळ्यांबद्दल मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता
    2024 muktachaitanya
    Mostra di più Mostra meno
  • K pop Idol व्हायचं म्हणून सोडलं घर..| k pop idol vhayaych mhanun sodala ghar
    Nov 27 2023

    इंटरनेटमुळे आता जग अतिशय जवळ आलं आहे. त्यामुळे कधीकाळी अशक्यप्राय वाटणारी स्वप्नं, आजच्या पिढीला आता आवाक्यात आल्यासारखी वाटू लागली आहेत. ही स्वप्नं आता तरुणाईला भुरळ घालतायेत. या भुरळ घालणाऱ्या स्वप्नांपैकी एक स्वप्न म्हणजे, कोरीयन पॉप music आणि कोरियन फिल्म इंडस्ट्रीत स्टार होण्याचं स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजची तरुणाई प्रयत्न करतेय. पण याच स्वप्नाळू तरुणाईला गळाला लावण्यासाठी सायबर गुन्हेगारही सज्ज आहेत.

    या स्वप्नाळू तरुण - तरुणींना सायबर गुन्हेगार कशाप्रकारे फसवू शकतात? आणि त्या फसवेगिरीपासून वाचण्यासाठी तरुणाईने कशी खबरदारी घेतली पाहिजे, याबद्दल सविस्तर माहिती देणारा हा पॉडकास्ट जरूर ऐका! 


    सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा: सायबर मैत्र 9307474960

    Mostra di più Mostra meno
    9 min
  • ऑनलाईन रमी म्हणजे जुगारचं ? | Online Rummy mhanje jugarch?
    Nov 20 2023

    ऑनलाईन रमी हा प्रकार म्हणजे नेमका काय आहे? ऑनलाईन रमीला 'गेम ऑफ चान्स' म्हणणे म्हणजे एक पळवाट आहे का? 'गेम ऑफ चान्स' म्हणत म्हणत ऑनलाईन रमीच्या नावाखाली ऑनलाईन जुगार सुरु झालाय का? याचं व्यसन लागू शकतं का? 'ग्रे फाऊंडेशन'चे संचालक चैतन्य सुप्रिया यांच्याशी ऑनलाईन रमी या विषयावर आपण गप्पा मारल्या आहेत. नक्की ऐका!   

    सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा: सायबर मैत्र 9307474960

    Mostra di più Mostra meno
    29 min
  • सगळ्यात मोठा डेटा लीक? | Saglyat motha DATA Leak?
    Nov 13 2023

    न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR या संस्थेवर सायबर हल्ला झाला असून त्यात ८१.५ कोली भारतीयांचा डेटा लीक झाला आहे आणि आता तो डार्क वेब मध्ये विक्रीसाठी आला असल्याचे बातमीत सांगण्यात आले आहे.  तर याच संदर्भात प्रसिद्ध सायबर इन्व्हेस्टीगेटर आणि सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ रितेश भाटिया यांच्याशी याच विषयावर मी बातचीत केली आहे. बघूया ते काय सांगतायत?

    सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा: सायबर मैत्र 9307474960

    Mostra di più Mostra meno
    15 min

Sintesi dell'editore

नमस्कार, स्क्रीन टाइम विथ मुक्ता या माझ्या पॉड कास्ट मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. या पॉडकास्टमध्ये आपण सायबर चॅट करणार आहोत. ऑनलाईन ट्रेंड्सपासून सायबर स्पेसचा आपल्यावर होणाऱ्या परिणामांपर्यंत सगळ्यांबद्दल मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता
2024 muktachaitanya

Cosa pensano gli ascoltatori di Screen Time With Mukta

Valutazione media degli utenti. Nota: solo i clienti che hanno ascoltato il titolo possono lasciare una recensione

Recensioni - seleziona qui sotto per cambiare la provenienza delle recensioni.