रामकुटी (Ramkuti) copertina

रामकुटी (Ramkuti)

रामकुटी (Ramkuti)

Di: Shrikant Borkar
Ascolta gratuitamente

A proposito di questo titolo

राम कुटी पॉडकॉस्ट विविध प्रकारचे स्तोत्र साठी आहे ही स्तोत्रे राम रक्षा व्हाट्सअप ग्रुप मधील साधकांच्या आवाजात आहे. फॉलो करा रामकुटी https://whatsapp.com/channel/0029Va4zngu6WaKiIdZ8kH0b

Copyright 2022 Shrikant Borkar
Induismo Scienze sociali Spiritualità
  • आईसाठी अधूनमधून एक चॉकलेट नेत जा, ... ️@Ramkuti
    Feb 11 2026

    आईसाठी अधूनमधून एक चॉकलेट नेत जा,
    त्यातून तुलाही अर्धं प्रेम मिळत जाईल… ️

    थकलेल्या दिवसाच्या संध्याकाळी जेव्हा घरी परतशील,
    हात रिकामे असले तरी, मन भरून घेऊन येत जा…
    पण कधीतरी हास्यासोबत, ती छोटीशी गोड भेटही,
    आईच्या नावाचं चॉकलेट सोबत नेत जा…

    आईसाठी अधूनमधून एक चॉकलेट नेत जा,
    त्यातून तुलाही अर्धं प्रेम मिळत जाईल…

    ती काही बोलली नाही तरी डोळे बोलतात,
    दरवाजाच्या आवाजावर अपेक्षा डोलतात,
    तिच्या वाट्याचा आनंद असाच टाळू नकोस,
    थोडा वेळ, थोडी माया तिला देऊन जात जा…

    आईसाठी अधूनमधून एक चॉकलेट नेत जा,
    त्यातून तुलाही अर्धं प्रेम मिळत जाईल…

    जिने प्रत्येक कडवटपणात तुला गोड ठेवलं,
    आपली स्वप्नं बाजूला सारून तुझं रक्षण केलं,
    त्या आईसाठी काही खास करण्याचं निमित्त नको,
    फक्त असंच प्रेम व्यक्त करण्याची संधी साधत जा…

    आईसाठी अधूनमधून एक चॉकलेट नेत जा,
    त्यातून तुलाही अर्धं प्रेम मिळत जाईल…

    लक्षात ठेव, आईला वस्तूंच्या किमतीशी देणंघेणं नसतं,
    तिला तर फक्त तुझ्या सोबतीची सवय असते,
    तिच्या चेहऱ्यावरचं हास्य हीच सर्वात मोठी दौलत आहे,
    ती दौलत तिला वारंवार देऊन जात जा…

    आईसाठी अधूनमधून एक चॉकलेट नेत जा,
    त्यातून तुलाही अर्धं प्रेम मिळत जाईल…


    #रामकुटी #श्रीराम #श्रीरामभक्ती #रामनाम #रामराम #जयश्रीराम #रामचरित #रामभाव #रामप्रेम #रामस्मरण #रामधून #रामनाद #रामनामजप #रामनामचमत्कार #रामकविता #रामगीत #भक्तिगीत #भक्तीकाव्य #शब्दगुंफण #भावकुटी #मराठीभक्ती #मराठीकविता #मराठीसंगीत #आध्यात्मिक #सनातनधर्म #हिंदुधर्म #राममार्ग #रामभक्त #रामभावना #रामसंस्कार #Ramkuti #RamBhakti #RamNaam #JaiShriRam #RamMantra #RamDhuni #RamPoetry #RamBhajan #SpiritualVibes #IndianCulture #Sanatan #Hinduism #DevotionalMusic #MarathiBhakti
    Mostra di più Mostra meno
    3 min
  • रामको देखकर जनकनंदिनी ! Mrs. Tripta Ashok Sharma.@Ramkuti
    Nov 27 2025
    Mrs.Tripta Ashok Sharma.
    Mostra di più Mostra meno
    4 min
  • अक्कलकोटी स्वामी निवासी@ramukti #rankuti #स्वामीसमर्थ
    Aug 13 2025
    अक्कलकोटी स्वामी निवासी
    ब्रम्हांड नायका रक्षण करता
    भक्ती तुझी भक्तांच्या अंतरी
    भिऊ कशाला तू पाठी असता

    मनी चिंता असते जरी
    नामस्मरण करावे स्वामींचे
    दुःख दूर जाते हो नामाने
    हेच सत्य आहे भगवंताचे

    दत्तरूपी श्री स्वामी समर्थ
    मूर्तीमंत रूप तुझे देखणे
    सेवा करुनी जीवनी तरुनी
    आशीर्वाद द्यावा हेच मागणे

    दुःख होता मार्ग दाखवा
    गोडी लागली अविट खरी
    उपासना करूनी स्वामींची
    जाती संकटे वरचे वरी

    लेखन लीलाताई वानखेडे नाशिक
    गायन डॉ.देवयानी विश्वास देशमुख, मंगळवेढा
    Mostra di più Mostra meno
    2 min
Ancora nessuna recensione